आता पुण्यात रोज एकदाच होणार पाणीपुरवठा

0

पुणे :वाढत्या पुणे शहराला दररोज सुमारे सोळाशे एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना केवळ 1150 एमएलडी पाणी निर्णय कालवा बैठकीत झाला आहे. या निर्णयामुळे शहरात पाणीकपात अटळ असून यापुढे एकदाच पाणी येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. येत्या आठवड्यात पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तयार करून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

आज मुंबईत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली खडकवासला कालवा समितीची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत पुणे शहराला दरदिवशी पाणी देण्याचा तर शेतीसाठी रब्बीसाठी दोन आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. सध्या महापालिका शहराला पाणी पुरवठा करताना प्रतिदिन १६०० ते १६५० एमएलडी पाणी वापरत आहे. यामुळे शहरातील मध्यवस्तीत दोन वेळा तर उपनगर भागात एकदा पाणीपुरवठा केला जातो. मात्र या निर्णयामुळे सर्व शहराला पुरेशा दाबाने पाणी पोचवायचे असेल तर एकवेळच पाणी पुरवठा करता येणार आहे. दरम्यान या बैठकीत पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे आणि उपस्थित एकाही आमदाराने याबाबत आक्षेप नोंदवला नाही. खडकवासला धरण साखळी सोडून इतरत्र कोठेही धरणात पुरेसे पाणी नसल्यामुळे जलसंपदा खात्याने असा निर्णय घेतल्याचे समर्थंन यावेळी करण्यात आले.