धुळे । जनहित याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाबाबतच्या नियंत्रणाबाबत निर्देश दिलेले आहेत. सदर निर्देशांना अनुसरून गृह विभाग, महाराष्ट्र शासन यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 मधील तरतुदीनुसार 14 जुलै 2015 रोजीच्या अधिसूचनान्वये ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी प्राधिकृत अधिकार्यांची नेमणूक केली आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक चैतन्या एस. यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. धुळे जिल्हा ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिकार्यांची नावे पुढील प्रमाणे असून जिल्हा कार्यक्षेत्रातील जनतेला ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रार करावयाची असल्यास ते संबंधित प्राधिकृत अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे तक्रार नोंदविण्याची कार्यवाही करावी. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एका अधिकार्याची ध्वनी प्रदूषण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. या सबंधित काही समस्या आल्या संबंधित अधिकार्यांशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे,
नियम मोडल्यास कैद किंवा दंडाची शिक्षा
पुढील भागात मर्यादेपेक्षा जास्त आवाजाने लाऊड स्पीकर, फटाके, वाद्य वाजविण्यास बंदी केलेली आहे. ते असे (अनुक्रमे विभागाचे कोड, विभाग/झोनची वर्गवारी, आवाजाची क्षमता (डेसिमलमध्ये, दिवसाचे वेळी व रात्री या क्रमाने) : ए, औद्योगिक क्षेत्र (खपर्वीीीींळरश्र -ीशर), 75, 70. बी, विपणन क्षेत्र (उेााशीलळरश्र -ीशर), 65, 55. सी, रहिवासी क्षेत्र (ठशीळवशपींळरश्र -ीशर), 55, 45. डी, शांतता विभाग (डळश्रशपलश नेपश), 50, 40. नमूद मर्यादेचे उल्लंघन होणार नाही याची संबंधितांनी दक्षता घ्यावी. ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) 2000 चे उल्लंघन केल्यास इनव्हायरमेंट (प्रोटेक्शन) क्ट 1986 चे कलम 15 प्रमाणे 5 वर्षे कैदेची किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होवू शकते. तसेच शिक्षा होवून सुध्दा असे गुन्हे चालू ठेवल्यास पुढील प्रत्येक दिवसाला 5 हजार रुपये दंडाची तरतूद आहे. तसेच कलम 15 (1) प्रमाणे शिक्षा लागल्याचे 1 वर्षापर्यंतच्या काळात पुन्हा असे गुन्हे केल्यास 7 वर्षापर्यंतची
शिक्षा होवू शकते. यानियमाखालील गुन्हे दखलपात्र, अजामिनपात्र व प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडे चालतील. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाचा अवमान केला म्हणून कारवाई होवू शकते. ध्वनी प्रदूषण संदर्भातील तक्रार पुढील दूरध्वनी क्रमांक, इ- मेल आयडीवर करू शकतात. नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक : 02562- 288211/12/13, व्हॉटसप क्रमांक : 9404153520/ 9404153519 आहेत, असेही अपर पोलिस अधीक्षक गवळी यांनी कळविले आहे.
नियमांचे काटेकोरपणे पालन करावे
मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावरुन सण/उत्सवाच्या वेळी ध्वनी प्रदूषण होवू नये यासाठी नागरिकांनी आपापल्या सोसायटीत, गावामध्ये लाऊड स्पीक मोठ्याने अगर कर्कश आवाजात वाजवू नये. मा. सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण संरक्षणाचा कायदा 1986, ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 मधील तरतुदींचे सक्त पालन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्या अन्वये रात्री 10.00 पासून ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत लाऊड स्पीकर, फटाके, वाद्य वाजविण्यास सक्त बंदी केलेली आहे. तसेच सकाळी 6.00 वाजेपासून रात्री 10.00 वाजेपर्यंत सुध्दा लाऊड स्पीकर, फटाके, वाद्य, इत्यादी मर्यादेपेक्षा जास्त आवाजाने वाजविण्यास बंदी केलेली आहे, असे अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.