शहादा । येथील नगरपालीकेने बांधकाम परवाने ऑनलाईन पध्दतीने सुरु केले आहे. व नंदुरबार जिल्ह्यात बांधकाम परवाने ऑन लाइन सुरु करण्याचा बहुमान शहादा नगरपालिकेने मिळविला आहे. यापुढे नव्याने घर बांधणार्याना किंवा व्यावसायीक बांधकाम करणार्याना सर्व कागदपत्रे आता ऑनलाईन भरावयाची आहेत.
कार्यालयाच्रा चकरा टळल्रा
शहरात कुठेही बांधकाम करावयाचे झाले तर सामान्य नागरीकांपासुन तर मोठ्या उद्योग पतीपर्यंत सर्वानाच बांधकाम परवाने घेण्यासाठी कार्यालयाचा खेटा माराव्या लागत असे. शिवाय सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करुन देत नागरीक त्रस्त होत असत. त्यामुळे शहादा नगरपालिकेने ऑफ लाइन परवाने बंद करत ऑन लाइब परवाने आज पासुन सुरु केलेत व आजच ऑनलाईन पहिली परवानगी प्रशांत नरहरी सोनार यांना दिली आहे. सदर परवानगी प्रमाणपत्र सोनार याना पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ , जि. प. सदस्य अभिजित पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी नगर अभियंता विजय चौधरी , समनवयक अभियंता श्रीमती सयुंक्ता महाले बांधकाम सभापती योगिता चौधरी, कार्यालय पर्यवेक्षक गजेन्द्र सावरे , नगरसेवक वसीम तेली उपस्थित होते. काही त्रूटी असल्यास फॉर्म स्विकारला जाणार नाही. ऑनलाईन फॉर्म भरल्याने नगरपरिषद कार्यालयात गैरव्यवहार होणार नाही व नागरीकांचे हेलपाटे देखील वाचतील. ऑनलाइन पध्दतीने परवानगी देणे कामी कंपनीचे प्रतिनिधी सयुंक्ता महाले व विजय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.