मुंबई | भारतातून युरोपात जाणाऱ्या फ़्लाईटसाठी 45 हजारांहून अधिक मोजणाऱ्या विमानप्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यापुढे त्यांना फक्त 12 हजारात भारतातून युरोपात विमानप्रवास करता येईल. हे शक्य झालेय ते सिंगापूरस्थित लो-कॉस्ट एअरलाईन (एलसीसी), ‘स्कूट’मुळे! भारतातून युरोपात थेट फ्लाईट ऑपरेट करण्याचा परवाना असणारी स्कूट आता भारत-युरोप (मुंबई-कोपेनहेगेन) एकेरी प्रवास 12 ते 13 हजारात ऑफर करणार आहे. यात 20 किलोग्रॅम चेक-इन लगेज व मील्स मोफत असतील. तर 26 हजारात युरोपचे रिटर्न जर्नी तिकीट उपलब्ध केले जाणार आहे. सध्या भारतातून युरोपात जाणाऱ्या थेट फ़्लाईटसचे किमान भाडे 45 हजारापासून सुरु होते. मध्य-पूर्वेत हॉल्ट घेणाऱ्या ट्रान्झिट फ़्लाईट्सवरही ‘स्कूट’चे स्वस्त भाड्याचे लाभ मिळू शकतील. ‘स्कूट इंडिया’चे प्रमुख भारत महादेवन यांनी ‘जनशक्ति’ला ही माहिती दिली.
इतकी स्वस्त ऑफर कशी?
‘स्कूट एअरलाईन्स’कडे ‘फिफ्थ फ्रीडम’ परवाना आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही दोन देशांत थेट विमानसेवेचा अधिकार प्राप्त होतो. या परवान्यामुळेच ‘स्कूट’ला मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता येथून थेट कोपनहेगेन, विएन्ना, कैरो आणि मँचेस्टर दरम्यान त्यांच्या सोयीने व दराने विमानसेवा ऑफर करता येते.
जगाची प्रवासाची सवय बदलतेय
‘स्कूट’च्या या विचारापलीकडील स्वस्त भाड्यामुळे लॉंग-हॉल (अधिक वेळ प्रवासाच्या) फ़्लाईट्स पर्यायामुळे जगाची प्रवासाची सवय बदलतेय. मागणी अधिक वाढू लागलीय, तसतसा पुरवठाही वाढतोय; नव-नव्या रुट्सवर ‘स्कूट’ची सेवा सुरु होतेय. मे-जून 2017 च्या सेंटर फॉर आशिया-पॅसेफिक (सीएपीए) अहवालानुसार, जगभरच्या हवाई इतिहासात प्रथमच लाँग-हॉल, लो-कॉस्ट फ़्लाईट्सनी आठवड्यात 5 लाख हून अधिक बुकिंगचा टप्पा पार केलाय.
इंडिगो, ‘स्पाईसजेट’ही स्पर्धेत
‘स्कूट’प्रमाणेच आता इंडिगो आणि ‘स्पाईसजेट’ही लाँग-हॉल, लो-कॉस्ट फ़्लाईट्सच्या स्पर्धेत उतरण्याच्या तयारीत आहेत. लवकरच मुंबई किंवा दिल्लीतून इंडिगो, ‘स्पाईसजेट’च्या लंडन-गॅटविक लो-कॉस्ट फ़्लाईट्स सुरु होणार आहेत.
फ्लायस्कूट’च्या भन्नाट ऑफर्स
अमृतसरहून :
सिंगापूर – 5,099
मेलबर्न – 13,099
सिडनी – 13,699
पर्थ – 10,099
बँकांक – 7,299
चेन्नईहून :
सिंगापूर – 5,099
मेलबर्न – 12,899
सिडनी – 12,899
पर्थ – 10,099
दी गोल्ड कोस्ट – 11,499
तैपई – 12,299
बँकांक – 7,099
नान्जिंग – 13,299
जयपूरहून :
सिंगापूर – 5,099
मेलबर्न – 13,499
सिडनी – 13,999
पर्थ – 10,399
दी गोल्ड कोस्ट – 12,099
हॉंगकॉंग – 11,999