नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या संघर्षामध्ये आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उडी घेतली आहे. एका मंत्राद्वारे चीनचा सामना करण्याचे आवाहन आरएसएसने केले आहे. या मंत्राच्या पाच वेळा जप करण्याने चीनवर नियंत्रण मिळण्यासाठी मदत होणार आहे. यामुळे पूजा किंवा नमाज पठन करण्याआधी पाच वेळा मंत्र पठन करण्याचे आवाहन आरएसएसने केले आहे. “कैलाश, हिमालय और तिब्बत चीन की असुर शक्ति से मुक्त हों” अर्थात ‘कैलास, हिमालय आणि तिबेट चीनच्या असुरी शक्तीपासून मुक्त होवो’ असा तो मंत्र आहे.
चीन, भूटान आणि भारताची सीमा डोकलाममध्ये आहे. भूतानच्या डोकलाम भागातून भारतीय सैन्य हटवण्यासाठी चीनकडून भारतावर दबाव आणण्यात येत आहे; मात्र भारताने येथून कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान दोन्ही देशातील संबंध टिकवण्यासाठी तसेच सीमावादावरील चर्चेसाठी भारताने विनाअट आपले सैन्य मागे घ्यावे’ अशी मागणी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली होती. जवळपास एका महिन्यापासून सीमावादावरुन दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू आहे.
या मुद्द्यावरून चीनचा सामना मंत्रविद्येद्वारे करण्याचे आरएसएसणे योजले आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार आरएसएस चीनच्या’असुर शक्ति’ अर्थात वाईट शक्तीला या मंत्राद्वारे नियंत्रित करणार आहे. हिंदू असो वा मुसलमान, सामुहिकरीत्या ह्या मंत्राचे पठन करण्याचे आवाहन त्या-त्या धर्माच्या प्रार्थनेआधी करण्याचे आवाहन आरएसएसने केले आहे. एक्नादारीत सर्व भारतीयांना ‘कैलास, हिमालय आणि तिबेट चीनच्या असुरी शक्तीपासून मुक्त होवो’ या मंत्राचा जप पूजा अथवा नमाज पठनाच्या आधी करण्याचे आवाहन केले आहे. आरएसएसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी सांगितले की, यामुळे चीनला नुकसान तर होणार आहेच मात्र आपल्या अध्यात्मिक शक्तीमध्ये देखील वाढ होऊन सकारात्मक प्रभाव पडणार आहे. कुमार यांनी सांगितले आहे की, चीनी वस्तूंच्या भारतीय मार्केटमध्ये येण्याने भारतीयांचा रोजगार देखील हिसकावला आहे.
आरएसएसची शाखा स्वदेशी जागरण मंचच्या सदस्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना नागपुरातील ८५१ करोड रुपयांचा चीनी कंपनीचा चाइना रेलवे रोलिंग स्टॉक प्रोजेक्ट रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान अमेरिकेने भारत आणि चीनला या मुद्द्यावर सरळ संवाद करण्याचे आवाहन केले आहे.