आता मिशन टी -20 महिला विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा

0

नवी दिल्ली । मागील 18 वर्षांपासून भारतीय महिला क्रिकेट संघाची आधारस्तंभ असलेली मिताली राज विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर निवृत्ती स्विकारेल असा अंदाज होता. भविष्यातील वाटचालीबाबत अद्याप कुठलाही निर्णयाप्रत न पोहचलेल्या मितालीने आता पुढील वर्षी वेस्टइंडिजमध्ये होणार्‍या टी-20 महिला क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेवर लक्श केंद्रित केले असल्याचे सांगितले. बीसीसीआयच्या गौरव सोहळ्यादरम्यान मितालीने हा खुलासा केला.

आयसीसी महिला विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत उपविजयी ठरलेल्या भारतीय संघाचा गुरुवारी बीसीसीआयतर्फे गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात संघातील खेळाडूंना रोख 50 लाख आणि सहयोगी स्टाफला 25 लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पुढील विश्‍वचषक स्पर्धेतही खेळायला उत्सुक असल्याचे मितालीने सांगितले. मिताली म्हणाली की, कुठल्याही खेळाडूची विश्‍वचषक स्पर्धेत खेळण्याची इच्छा असते. विश्‍वचषक स्पर्धेपर्यंत फॉर्म आणि फिटनेस कायम राहिला तर नक्की खेळेल.