आता मुख्यमंत्र्यांचीही होणार इन कॅमेरा चौकशी; मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्यास मंजुरी
मुंबई – मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी गेल्या अनेक वर्षापासून लावून धरली होती अखेर ही मागणी राज्य शासनाने मान्य केले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रीही लोकायुक्तांच्या कक्षेत येणार आहे. राज्य सरकारने आज हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियम सुधारणेला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्यात यावे अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली होती. अखेर आज राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांची इन कॅमेरा चौकशी करण्याचे अधिकार लोकायुक्तांना प्राप्त होणार आहेत.