सुमेरपूर-‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी आणि ऑस्कर फर्नाडिस यांच्या २०११-१२ या वर्षांतील प्राप्तिकराची पुन्हा चौकशी करण्यास सुप्रीम कोर्टाने काल मंजुरी दिली आहे. त्यामुळे सोनिया-राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आम्ही सुप्रीम कोर्टात जिंकली आहे. केंद्र सरकारला त्यांच्या प्राप्तिकराचे पुनर्मूल्यांकन करण्याचा अधिकार असून आता कसे वाचाल ते बघतोच, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील सुमेरपूर येथे जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. ‘हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलालाला दुबईवरुन भारतात आणण्यात यश आले. आता बड्या लोकांचे बिंग फुटणार, ही गोष्ट कुठवर जाईल काहीच माहित नाही’, असे सूचक विधानही त्यांनी केले.