मुंबई: रिझर्व्ह बँक ही देशाच्या अर्थव्यवस्थेची संरक्षक असते. पण विद्यमान राजवटीत रिझर्व्ह बँकेचे झिंगलेले माकड झाले असून त्या माकडाने देशाच्या अर्थव्यवस्थेलाच आग लावली आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिझर्व्ह बँक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे.
त्यामुळं नोटाबंदीचा निर्णय फसल्याची देशभरात चर्चा आहे. हीच संधी साधून उद्धव यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून मोदी सरकारबरोबरच नोटाबंदीच्या निर्णयात त्यांना सहकार्य करणाऱ्या रिझर्व्ह बँकेवर कडाडून टीका केली आहे. ‘देशाच्या जनतेकडे मी 50 दिवस मागतो. त्यानंतरही माझा निर्णय चुकल्याचं सिद्ध झाल्यास भर चौकात उभा राहून जनता देईल ती शिक्षा भोगण्यास मी तयार आहे, असं पंतप्रधान नोटाबंदीनंतर म्हणाले होते. याची आठवण करून देतानाच, ‘आता मोदी कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत’ असा सवाल उद्धव यांनी केला आहे.