नवी दिल्ली-‘पेज 3′ आणि ‘साथीया’ मधील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री संध्या मृदुलने संस्कारी बाबू अभिनेता आलोक नाथ यांचावर लैंगिक छळाचे आरोप केले आहे. संध्या मृदुलने फेसबुक पोस्ट लिहित हे आरोप केले आहे. अलोक नाथ आणि अभिनेत्री रीमा लागू यांच्यासोबत काम करीत असतांना एका रात्री अलोक नाथ खोलीत घुसले आणि बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. आलोक नाथ यांच्यावर प्रथम अभिनेत्री विनिता नंदा यांनी बलात्काराचे आरोप केले होते. त्यामुळे ते चर्चेत आले. आता संध्या मृदुल यांच्या आरोपामुळे यात आणखी भर पडली आहे.