निजामपुर। साक्री तालुक्यातील रेशन दुकानदार संघटनेचा पदाधिकार्यानी गंगाखेड जिल्हा परभणी येथे राज्यस्तरी मेळाव्यात सहभाग झाले होते. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांनी सांगितले की, शासनचया बदलत्या धोरणामुळे रेशनदुकानदारांसमोर अनेक अडचणी व समस्या निर्माण झाल्या आहेत शासनामार्फत रेशनदुकानदारांना मिळणारे कमिशन अल्प असल्याने आता कमिशन नको पगार दया, वर्मा कमेटीच्या शिफारशी लागु करा म्हणून रेशनदुकानदाराचा लढा तिव्र झाला असुन त्यासाठी राज्य ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्श फेडरेशनचा राज्य सतरी मेळावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गजानन बाबर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला त्या मेळाव्यासाठी धुळे जिल्हायातुन साक्री तालुक्यातील अध्यक्ष संजय साबळे साक्री तालुका अध्यक्ष दिलीप पवार. सी एस पाटील बाळकृष्ण वाणी, भिवा बोरकर, संभाजी नांद्रे, राकेश चौधरी आदी उपस्थित होते.
राज्यातून संघटनेच्या पदाधिकार्यांची उपस्थिती
या मेळाव्यात माजी खासदार गजानन बाबर बोलतांना म्हणाले की, शासनसह समाजामध्ये रेशनदुकानदाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन नेहमीच वेगळा असतो. वेळोवेळी रेशनदुकानदारांची पुरवठा विभागाकडून पिळवणूक व अडवणूक होत असते. याला आपलाच दुकानदार जबाबदार असतो, यासाठी संघटन महत्त्वाचे असून सर्व दुकानदार आपले कुटुंब आहे. याची जाणिव सर्वानी ठेवून संंघटीत राहून शासनाला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडावे असे आवाहन गजानन बाबर यांनी केले आहे. यावेळी धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातुन रेशनदुकानदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थितीत होते. धुळे अशी माहिती जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील धुळे जिल्हा अध्यक्ष संजय साबळे यांनी दिली.