आता वल्लभनगर आगारातून धावणार सात शिवशाही बस

0

पिंपरी-चिंचवड : वल्लभनगर आगारात एस.टी.महामंडळाच्या सात शिवशाही बस रविवारी (दि. 24) दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आता पिंपरी-चिंचवडकरांना वातानुकूलित बससेवा त्यांच्याच शहरातून मिळणार आहे. प्रवासी मंचतर्फेही पिंपरी-चिंचवड शहरासाठी शिवनेरी व शिवशाही बससाठी वारंवार मागणी केली जात होती. या प्रयत्नांना यश आले आहे. पूर्वीच्या आगाराच्या ताफ्यात 58 बस आहेत. त्यामध्ये आता शिवशाही बसची भर पडली आहे.

कोणत्या मार्गावर धावणार याकडे लक्ष
शिवशाही वातानुकूलित बस, आकर्षक डिजिटल बोर्ड, पुशबॅक आरामदायी सीट, टू बाय टू आसनव्यवस्था, मोबाइल चार्जर, सीसीटीव्ही, अनाउन्समेन्ट सिस्टिम अशी या बसची वैशिष्ट्ये आहेत. या बसची आसनक्षमता 43 आहे. पुढील काळात आणखी काही बसची भर पडणार आहे. मात्र याबस कोणत्या मार्गावर धावणार हे अद्याप ठरलेले नाही. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने स्वस्त दरात वातानुकूलित सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू केलेली ‘शिवशाही’ बस सेवा उशीरा का होईना पिंपरी-चिंचवडकरांना मिळाल्याचे याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले आहे. आता फक्त त्या कोणत्या मार्गावर व कधी धावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.