आता विघटनकारी प्लास्टिकची निर्मिती शक्य

0

कधीही नष्ट न होणारी गोष्ट म्हणजे प्लास्टिक. जगभरात दररोज कोट्यवधी टन प्लास्टिक जमा होते. या प्लास्टिकची विल्हेवाट लावणे अशक्य आहे. कारण प्लास्टिक अविघटनशील पदार्थ असून प्लास्टिकच्या पिशव्यांशिवाय दररोजच्या वापरात काही चालत नाही. यावर उपाय म्हणून चक्क पाण्यात विरघळणारे ईको फ्रेन्डली प्लास्टिक बनवण्यात येत आहे, असे जर वृत्त आले तर अवघ्या जगाला आश्‍चर्य वाटेल. मात्र, तसे प्रत्यक्षात प्लास्टिक अस्तित्वात येणार आहे. त्यासाठी कोल्हापुरातील मातीतून घडलेला आपण स्वतः तसा फॉर्म्युला बनवलेला आहे. विशेष म्हणजे जनावरांनी जरी हे प्लास्टिक खाल्ले तरी त्यांना याचा अपाय होणार नाही. अशा प्रकारच्या बायोडिग्रेबल प्लास्टिकच्या पिशव्या बनवण्याचा आपला मानस आहे.

या पिशव्या स्टार्च आणि वनस्पतीचे तेल वापरून तयार केल्या जातील. बटाटे, मका, स्टार्च, केळी आणि फुलांचे व वनस्पतीचे तेल वापरून या प्लास्टिकच्या पिशव्या बनवण्यात येतील. पिशव्या प्रत्यक्ष बनवण्यासाठी किमान 5 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट असेल. या पिशव्या बाजारात 1 रुपयापासून 30 रुपयांच्या आसपास उपलब्ध करत येऊ शकतात. 24 तासांतच या पिशव्या पाण्यात विरघळतील किंवा गरम पाण्यात काही मिनिटांत या पिशव्या विरघळतील. प्लास्टिक ही गंभीर समस्या बनत चालली असून, पर्यावरणाला त्यामुळे खूप हानी पोहोचत आहे. एका संशोधनानुसार गेल्या पन्नास वर्षांत प्लास्टिकचा वापर 50 लाख टनांवरून 10 कोटी टन इतका पोहोचला आहे. भारतात दरदिवशी 15 हजार टन प्लास्टिक कचरा तयार होतो. त्याची विल्हेवाट लावणे ही सगळ्यात मोठी समस्या बनल्यामुळे, प्लास्टिकमुक्त भारत करण्याच्या उद्देशाने जगाला हेवा वाटेल, असा फार्म्युला आपण तयार केला आहे. जगभरात दरोरज कोट्यवधी टन प्लास्टिक जमा होते, या प्लास्टिकची विल्हेवाट लावणे आश्यक्य आहे.

कारण प्लास्टिक अविघटनशील पदार्थ आहे आणि प्लास्टिक पिशव्यांशिवाय दरोरोजच्या वापरात काहीच चालत नाही. भारतातच नव्हे, तर परदेशातही समुद्र, नाले, पर्यावरण तसेच पाणीही या प्लास्टिकमुळे दूषित होत आहे. याचे सगळ्यात मोठे कारण प्लास्टिक पिशव्या असल्याचे जागतिक स्तरावरही मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे समुद्री जीवनावर, मुक्या जीवावर तसेच मानवी जीवनावरही त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. मुंबईत होणार्‍या थोड्याबहुत प्रमाणात पावसातही मुंबईतील नाले आणि खाड्या तुडुंब भरतात परिणामी पाणि साचून मुंबई डुबून जाते. यंदाच्या वर्षी पावसाळ्यात आलेला अनुभव हाच सांगतो की, मुंबईत बेसुमार प्लास्टिक वापराचा परिणाम म्हणून मुंबईतील सांड पाणि व्यवस्था बंद पडते. हा प्रश्‍न नुस्ता मुंबईपुरता नसून तो राज्यभराचा पर्यायाने देशभराचा बनलेला आहे. जागतिक पातळीवरही याविषयाने उग्र स्वरूप धारण केलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागानेही संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला असून, त्याची सुरुवात सरकारी कार्यालयांपासून करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधून प्लास्टिकसंबंधी गोष्टींवर बंदी आणण्यात येणार आहे. मात्र, तत्पूर्वी पर्याय निर्माण करणे गरजेचे आहे. तो पर्याय या विघटनशील प्लास्टिकच्या पिशव्या ठरू शकतात.

सुशांत पाटील
केमिकल इंजिनियर,मुंबई
9920828828