पुणे : आयटीतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी राबवलेल्या बडीकॉप या प्रकल्पाला मिळालेल्या यशानंतर आता विद्यार्थ्यांसाठी पोलीस काका हा उपक्रम सुरू केला आहे. या पोलिस काकांना सध्या प्रशिक्षण देण्याचे काम सुरू असून, पुढील आठवड्यापासून हा उपक्रम सुरु होईल, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले.
महाविद्यालये व शाळांमध्ये तरुण-तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला. महिलांसाठी बडीकॉप सुरू केल्यानंतर आमच्या मदतीसाठी काय असे विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत होते. त्यावर विचार करून पोलिस काका हा उपक्रम सुचला. प्रत्येक पाच शाळांसाठी एक पोलिस काका असेल. शाळेच्या बाहेर या पोलिस काकाचा मोबाईल क्रमांक लावलेला असेल. रॅगिंग तसेच विद्यार्थिंनीना कोणी त्रास देत असेल किंवा त्यांना इतर काही अडचण असतील, त्यावेळी हे विद्यार्थी या पोलिस काकांना फोन करून थेट मदत मागू शकणार आहेत. तात्काळ घटनास्थळी जाऊन विद्यार्थ्याला मदत करणार करेल. सध्या या पोलिस काकांना प्रशिक्षण दिले जात आहे. येत्या आठवड्यात पोलिस काका विद्यार्थ्यांच्या मदतीला येतील, असे आयुक्तांनी सांगितले.
महापालिका रस्त्यांच्या निविदा देताना ठेकेदारांकडून मिळणार्या मलिद्याकडे लक्ष देत असावे असेच यावरून दिसून येत आहे. जनतेचे लाखो रुपये निकृष्ट कामांमुळे वाया जात आहेत. त्याकडे प्रशासन गांभीर्याने पाहात नसल्यामुळे ‘नेमिची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे पावसाळा सुरू झाला की रस्त्यांची होणारी दूरवस्था पुणेकरांसाठी नित्याचीच झाली आहे.