आता शिवसेना सोनिया गांधींच्या आदेशावर चालणार: देवेंद्र फडणवीस

0

पालघर: विधानसभा निवडणूक युतीत लढून निवडणुकीनंतर भाजप-शिवसेनेत टोकाचे मतभेद झाले. शेवटी युती तुटली आणि शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार बनविले. यावरुन शिवसेनेवर बरीच टीका होत आहे. आपली विचारसरणी बाजूला ठेवून शिवसेनेने कॉंग्रेसशी हातमिळवणी केली असल्याचे आरोप सेनेवर होत आहे. दरम्यान आता शिवसेना कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशावर चालणार अशा शब्दात माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले. लोकसभेत नागरिकत्व कायद्याच्या बाजूने मतदान करणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेत मात्र तटस्थ राहून आपल्या विचारसरणीशी तडजोड केल्याचे आरोप फडणवीस यांनी केले. पालघर येथे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी ते बोलत होते.

शिसेनेने फक्त आमच्याशीच नाही तर जनतेशी देखील बेईमानी केली असल्याच्या शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या जीवावर सरकार बनविले असून ते फार काल टिकणार नाही असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. सत्तेत नसताना शेतकऱ्यांना २५ हजाराची मदत देण्याची भाषा करणाऱ्यांनी सत्तेत आल्यावर शब्द फिरविणे हा जनतेशी बेईमानी असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांना उद्धव ठाकरेंनी मदत केली नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.