आता शेतमालाची विमान वाहतूक होणार स्वस्त!

0
 राज्य सरकार पणन महामंडळाच्या मार्फत देणार ५० टक्के अनुदान
 निर्यात वाढून शेतकऱ्यांना फायदा होण्याची चिन्हे 
मुंबई – शेतकऱ्यांना आपला शेतमाल अधिकाधिक निर्यात करता यावा यासाठी सरकारने शेतमालाची विमानाने वाहतूक करता यावी म्हणून ५० टक्के अनुदान देण्याची योजना पणन मंडळाकडून देण्याचे जाहीर केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला आणि जास्त काळ टीकू न शकणाऱ्या नाशवंत मालाचा समावेश राहणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला शेतमाल हा नाशवंत असतो. हा नाशवंत शेतीमाला परराज्यात विक्रीसाठी गेला तर त्याला चांगील बाजारपेठ मिळू शकते. मात्र नाशवंत असल्यामुळे याची वाहतूक करणे मोठे अवघड काम आहे. कारण जम्मू काश्मीर तसेच ईशान्य पुर्वेकडील राज्यामध्ये शेतमाल पाठविणे अवघड आहे. या राज्यात विमानातून शेतमाल पाठविल्यास त्या शेतमालाच्या विमानाच्या वाहतूक खर्चात ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी एकत्रीत येऊन स्थापन केलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून पाठविण्यात आलेल्या शेतमालालाच विमानाच्या वाहतूक खर्चासाठी अनुदान देण्यात येणार आहे.
आठ हून अधिक राज्यात जाणार शेतमाल 
महाराष्ट्रातील शेतकरी त्यांचा नाशवंत आणि अतिनाशवंत असलेला शेतीमाल हा जम्मू काश्मीरसह मिझोरम, मणिपूर, नागालँड, मेघालय, त्रिपूरा, सिक्कीम आणि आसाम या राज्यांमध्ये विमानाने माल पाठविता येणार आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या या देशातंर्गत बाजारपेठेत हा माल पाठवतील तसेच परराज्यातून माल आपल्या राज्यात आणण्यासाठी देखील ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कंपन्यांनी पणन मंडळाकडे नोंदणी करणे गरजेचे आहे. तसेच शेतमाल पाठविण्याआगोदर तो पाठविण्यासाठी पणन मंडळाची परवानगी घेणे देखील आवश्यक असणार आहे.
योजनेसाठी ५० लाखांची तरतूद 
ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली असून या योजनेसाठी ५० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल पाठवितांना किमान २२ टन शेतीमाल पाठविणे बंधनकारक आहे. विमानाने शेतीमाल पाठवित असताना फक्त कार्गो विमानाने शेतीमाल पाठविणे बंधनकारक असणार आहे.