आता स्वागतपर लावलेले बॅनर काढावेत : भुसावळचे आमदार संजय सावकारे

Blessings showered on Bhusawal MLA Sanjay Sawkare throughout the day भुसावळ : भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परीवारातर्फे प्रोफेसर कॉलनीतील बियाणी स्कूलमध्ये अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन रविवारी सायंकाळी करण्यात आले. आमदारांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोशल मिडीया तसेच प्रत्यक्ष भेटून आमदारांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. याप्रसंगी आमदार म्हणाले की, मी आई-वडिलांमुळे मोठा झालो असून आईने दिलेल्या संगोपणामुळेच मी आज या पदावर आहे त्यामुळे प्रत्येक मुलांनी आई-वडिलांना नमस्कार करावा त्यांच्या आशीर्वादानेच आपण मोठे होत असतो असे उद्गार आमदार संजय सावकारे यांनी यावेळी केले.

तत्काळ कार्यकर्त्यांनी काढावेत बॅनर
दरम्यान, आमदार म्हणाले की, शहर व तालुकावासीयांनी मोठे प्रेम आपल्याला दिले असून कार्यकर्त्यांनी शहरात माझ्या वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर आणि फलक उद्याच्या दिवशी तत्काळ काढून रस्ते मोकळे करावेत. नमस्कार करायचा असेल तर आपल्या आई-वडिलांना करा त्यांच्या आशीर्वादामुळेच आपण मोठे होत असतो, असेही ते म्हणाले.

शैक्षणिक साहित्याचे वाटप
आमदारांच्या वाढदिवसानिमित्त शालेय शिक्षण साहित्य तुला करण्यात आली व त्यानंतर हे साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले तसेच नागरीकांना लाडू वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम संजय काका सावकारे मित्र परीवारातील गौरव राजेंद्र आवटे, सुमित राजेंद्र बर्‍हाटे, गौरव युवराज लोणारी, विशाल राजेंद्र नाटकर, हर्षल राजेंद्र बर्‍हाटे, आशिष ईश्वर पटेल, मोंटू अग्रवाल, अनिरुद्ध कुलकर्णी, वैभव लोणारी, भावेश चौधरी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला.