आता ह्या चित्रपटाला प्रियंकाने केला बाय-बाय!

0

नवी दिल्ली-सध्या प्रियांका चोप्रा अनेक कारणाने चर्चेत आहे. विदेशी कलाकारांसोबतचे लग्न असेल किंवा सलमान खानचा भारत हा चित्रपट सोडण्याचा घेतलेला निर्णय असेल या सर्व कारणांनी सध्या प्रियांका चर्चेत आहे. मागील आठवड्यात प्रियंकाने ‘भारत’ चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला होता त्या पाठोपाठ संजय लीला भन्साळींच्या एका बॉलिवूड चित्रपट सोडण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.

संजय लीला भन्साळींच्या ‘गंगूबाई कोठेवाली’ या गँगस्टर चित्रपटात काम करण्यास तिने नकार दिला आहे. वर्षभरापूर्वी या चित्रपटाबद्दलची बातमी आली होती. भन्साळी आणि प्रियांका या चित्रपटासाठी एकत्र येणार, अशी बातमी होती.

काऊबॉय निन्जा विकिंग या हॉलिवूड चित्रपटासाठी प्रियांकाने भन्साळींची नाराजी ओढवून घेतल्याचे समजते. तूर्तास प्रियांकाच्या या निर्णयाने भन्साळी अचंबित आहेत. सूत्रांचे मानाल तर हा चित्रपट करण्यास भन्साळी तयार होते. पण आता प्रियांकाने हा चित्रपट सोडला म्हटल्यावर त्यांनी तो थंडबस्त्यात टाकला आहे. सलमान आणि भन्साळी अशा दोघांचेही चित्रपट सोडण्यामागे नेमके काय कारण आहे, हे प्रियांकालाचं ठाऊक. पण प्रियांकाला हॉलिवूड फिव्हर चढला, असे आता म्हटले जावू लागले आहे. तूर्तास प्रियांका अमेरिकन सिंगर निक जोनाससोबतच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत आहे. दोघेही लवकरचं लग्न करणार, अशी बातमी आहे. सध्या तू तिथे मी,अशारितीने प्रियांका व निक एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.