नवी दिल्ली । गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनुसार आगामी काळात काश्मीरमध्ये आत्मघाती हल्ले वाढण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काश्मीरजवळील नियंत्रण रेषेच्या दिशेने दहशतवाद्यांच्या संशयित हालचाली दिसून आल्या आहेत. त्याचबरोबर काश्मीरमध्ये दडून बसलेल्या दहशतवाद्यांना त्यांच्या म्होरक्यांनी आणखी हल्ले करण्याचे आदेश दिले आहेत. तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे अजूनही कार्यरत आहेत, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्यांनी दिली आहे.