आत्मदहन करण्याचा तरूणाचा इशारा

0

अमळनेर – तालुक्यातील मांडळ येथे भारत निर्माण पेयजल योजना 2007 साली मंजूर करण्यात आली होती. याअंतर्गत 2009 ला हे काम पुर्ण होणार होते. परंतू ही योजना अजूनपर्यंत रखडलेली आहे. जवळपास या योजनेवर 64 लाख रूपये खर्च करण्यात आला आहे. ते काम पुर्ण व्हावे यासाठी गावातील तरूण सुदर्शन बाळासाहेब पवार यांने आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. पंचायत समिती आणि पाणीपुरवठा उपविभाग अमळनेर यांना ही योजना चालु व्हावी यासाठी गेल्या दोन महिन्यापासून अर्ज केला होता. यात जुनी जिर्ण झालेली पाईपलाईन बदलविण्याची मागणी करण्यात आली होती.