आत्मनिर्भर भारत बनविण्याची हीच योग्य वेळ: परदेशावर अवलंबून राहणे कमी करा

0

नवी दिल्ली: कोरोना महामारीच्या संकटात अनेक उद्योग धंदे अडचणीत सापडले आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र या संकटातून संधी देखील निर्माण होणार आहे. आज आपल्याला अनेक वस्तूंची आयात करावी लागते. परदेशातून आयात करणाऱ्या वस्तू भारतातच निर्मिती करण्याचा विचार होणे आता आवश्यक आहे. स्वदेशी वस्तू आपण कशा निर्यात करू शकू याचाच विचार करावा, तसेच दुसऱ्या देशावर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आत्मनिर्भर भारत बनविण्याची हीच ती वेळ असल्याचे ही मोदी यांनी सांगितले आहे. मोदींनी आज गुरुवारी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (ICC) विशेष कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते.

“गेले ९५ वर्षे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून देशसेवा केली जात आहे. आज देशाला आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता आहे. तसेच दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणं आता कमी करावं लागणार आहे,” असे मोदी यावेळी म्हणाले. “स्थानिक उत्पादनांसाठी क्लस्टरच्या आधारावर बळकटी देण्यात येत आहे. आयसीसीने ठरवल्यास याची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करता येऊ शकते. कोलकात्यानं पुन्हा एकदा लीडर बनण्याची वेळ आली आहे. बंगाल जो आज विचार करतो तो संपूर्ण देश पुढे करतो असं म्हटलं जात,” असंही त्यांनी नमूद केलं.