माजी मंत्री एकनाथराव खडसे ; पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पारीतोषिक वितरण
भुसावळ:- नॅकला सामोरे जाणारे हे आपल्या परीसरातील नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पहिले महाविद्यालय आहे याचा आपणास सार्थ अभिमान असून यशापर्यंत जाण्यासाठी जिद्द महत्त्वाची असते. यश व अपयशामध्ये जास्त अंतर नाही. यश हे आत्मविश्वासाने साध्य होईल. आत्मविश्वासाशिवाय यश येणार नाही, असे विचार माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केले. नाहाटा महाविद्यालयात विद्यालयात आयोजित पारीतोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. खडसे म्हणाले की, आपल्याला चांगल म्हणण्यासाठी मेहनत महत्त्वाची असते. समाजाच्या साक्षीने कौतुक व्हावे ही सर्वांचीच अपेक्षा असते. समाजाच्या साक्षीने कौतुक झाल तर प्रेरणा मिळत असते. विविध गुणांनी परीरपूर्ण व्यक्तीमत्त्व घडले पाहिजे. मोबाईल ही अति उत्साही गोष्ट आपल्या हातात आलेली आहे त्यामुळे वाचनाची सवय मागे पडली आहे म्हणून आपण वाचनाची सवय लावायला पाहिजे व व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करायला हवा.
व्यासपीठावर यांची उपस्थिती
अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय नाहाटा, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे संचालक प्रकाश फालक, भाजपा जळगाव जिल्हा संघटन सरचिटणीस डॉ. सुनील नेवे, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. व्ही. सी. कोल्हे, उपप्राचार्य डॉ.शिरीष झांबरे, उमवि अधिसभा सदस्य प्रा.ई.जी.नेहेते, प्राचार्य डॉ.मीमनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी, उपप्राचार्य प्रा.एन.ई.भंगाळे, कनिष्ट महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. शैलेश पाटील, पर्यवेक्षक प्रा.यु.बी.नंदाने, समिती प्रमुख प्रा.आर.आर.पाटील, विद्यापीठ विद्यार्थी सचिव कल्पेश बाविस्कर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी यांनी घेतले परीश्रम
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.रेखा गाजरे, प्रा.डॉ.रुपाली चौधरी, प्रा.पुरुषोत्तम महाजन यांनी केले. आभार समिती प्रमुख प्रा.आर.आर.पाटील यांनी मानले. यशस्वितेसाठी प्रा.व्ही.डी.जैन, प्रा.डॉ.पी.ए.अहिरे, प्रा.एस.टी.धूम, प्रा.प्रशांत पाटील, प्रा.डॉ.आर.एस.नाडेकर, प्रा.डॉ.एन.एस.पाटील, प्रा.डॉ.मनोज जाधव, प्रा.डॉ.सचिन येवले, प्रा.डॉ.विद्या पाटील, प्रा.डॉ. विलास महिरे, प्रा. शंकर पाटील, भगवान तायडे, श्रावण न्हावकर, भाग्येश झोपे यांनी परीश्रम घेतले. दरम्यान, सुवर्णपदक प्राप्त 46 विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला.
परीक्षेत आत्मविश्वास गरजेचा
भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातातील 2016 -2017 या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रसंगी सन्मानित करण्यात आले. डॉ. मोहन फालक म्हणाले की, आत्मविश्वासाशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही म्हणून आत्मविश्वास ठेऊन कोणत्याही परीक्षांना सामोरे जावे. महेश फालक यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बद्दल पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई सेवा ट्रस्ट तर्फे पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा नाथाभाऊंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.