आत्मशोध घेणाराच खरा सुशिक्षित – डॉ.यशपाल भिंगे

0
अहिल्यादेवी सेवा संघातर्फे केला गुणवंतांचा गौरव
नवी सांगवी : कष्ट करणारी माणसे जगात आपापल्या क्षेत्रात सर्वात पुढे असतात. परीक्षेत मिळालेल्या गुणांबरोबरच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान असणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या पाल्यास आवडत्या क्षेत्रात करियर करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचे जतन होणे आवश्यक आहे. ज्याच्याकडे आत्मशोध घेणारे मन आहे तो खरा सुशिक्षित असतो, असे मत व्याख्याते प्रा.डॉ.यशपाल भोंगे यांनी पिंपळे गुरव येथे व्यक्त केले. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यातिथी व गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ निमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी डॉ. यशपाल भिंगे यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, माजी उपमहापौर व जेष्ठ नगरसेविका माई ढोरे, नगरसेविका आशा शेंडगे, माधवी राजापुरे, माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे, डॉ.राम पडळकर, डॉ.दत्तात्रय माने, डॉ.राजेंद्र कुर्‍हाडे, डॉ.लक्ष्मण गोफणे, अ‍ॅड.राम शरमाळे, अलका सरग, विवेक बिडकर, श्रीगणेश बँकेचे अध्यक्ष सूर्यकांत गोफणे, उद्योजक अरुण पवार, संघाचे अध्यक्ष बाबासाहेब चितळकर, कार्याध्यक्ष मनोजकुमार मारकड, उपाध्यक्ष सुधाकर सूर्यवंशी, सचिन सरक, अभिमन्यु गाडेकर, उद्योजक अजय दूधभाते आदींसह समजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार जगताप म्हणाले की, गुणवंतांचा गौरव होणे हा त्यांच्यासाठी प्रेरणा देणारा ठरतो. प्रेरणा इतिहास घडविण्याचे कार्य करते. यावेळी आशा शेंडगे, अ‍ॅड.शरमाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष बाबासाहेब चितळकर यांनी प्रास्ताविक केले. आमदार लक्ष्मण जागताप यांच्या हस्ते समाजातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या कुटुंबियांचा धांगरी घोंगडी व तुळशीचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. अन्य उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व शालेय साहित्य देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ.अतुल होळकर, डॉ.दिनेश गाडेकर, विठ्ठल वागदरे, सूरज गोटके, मारुती काळे, संतोष काशिद, दादासाहेब देवकाते,निलेश गाडेकर, संपत भिटे, अशोक काळे आदींसह सर्व सभासद व समाज बांधवांनी परिश्रम घेतले. नामदेव तळपे यांनी सूत्रसंचालन केले.