आत्मसमर्पणासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत द्या-सज्जन कुमार

0

नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी नेते सज्जन कुमार यांनी आत्मसमर्पण करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंतचा मुदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे. नवी दिल्ली उच्च न्यायालयात त्यांनी अर्ज केला आहे. १९८४ च्या शीखविरोधी दंगल प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने सज्जन कुमार यांना दोषी ठरवत, जन्मठेपेची शिक्षा दिली आहे.

न्यायालयाने ३१ डिसेंबरपर्यंत कुमार यांना आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र काही कौटुंबिक जबाबदाऱ्या मार्गी लावण्यासाठी सज्जन यांनी न्यायालयाकडे थोडा कालावधी देण्याची मागणी केली आहे. सज्जन कुमार यांच्या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.

३४ वर्षांपूर्वी झालेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात सज्जन कुमार यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याआधी याच प्रकरणात त्यांची मुक्तता झाली होती. १ नोव्हेंबर १९८४ मध्ये दिल्लीच्या राज नगर भागात पाच शिखांची हत्या झाली होती. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयानं सज्जन कुमार यांची सुटका केली. या निकालाला सीबीआयने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले.