जळगाव । शेतकर्यांना आत्महत्या करण्याची दुर्देवी वेळ कधीच येऊ नये पण काळ्या आईची सेवा करणार्या बळीराजाच्या मागे राहिलेल्या कुटुंबाच्या मागे एक भाऊ म्हणून सदैव भक्कमपणे उभा राहणार असून आत्महत्या ग्रस्त शेतकर्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सुविधेसाठी दत्तक घेऊन त्यांना मदतीचा हात दिला जाणार असून दरवर्षा प्रमाणे 75 हजार वह्या या वर्षीही शेतकर्यांच्या मुलांना दिल्या जाणार आहे.आज जागतिक नेत्रदान दिनानिमित्त नेत्रदान करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले तसेच दिव्यांगांसाठी व जेष्ठ नागरिकांसाठी सर्वोतोपरी मदत केली जाणार, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते ना. गुलाबराव पाटील यानी केले. ते पाळधी येथे दिव्यांगांना मोटारसायकल वाटप व गुणवंत विद्यार्थी सत्कारा प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, नाना महाजन, धरणगाव तालुकाप्रमुख गजानन पाटील, जळगाव तालुकाप्रमुख नरेंद्र सोनवणे, रमाई हॉस्पिटल च्या अंजली बाविस्कर, पाळधीचे सरपंच प्रकाश पाटील, अंजली बाविस्कर, पं.स. उपसभापती प्रेमराज पाटील, पं.स.सदस्य नंदलाल पाटील, मुकुंद नंनवरे, अनिल पाटील, आसाराम कोळी, जळक्याचे रमेश पाटील, शाम कोगटा, सरपंच कैलास पाटील, डॉ. कमलाकर पाटील, डी.ओ. पाटील, मान्यरखेडा सरपंच राजू पाटील, माजी सरपंच अरुण पाटील, भरत पाटील तसेच शिवसेवा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांच्या चेहर्यावर समाधान
वाढदिवसांच्या निमित्ताने कार्यक्रमांचे केले आयोजन राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने जळगाव येथिल रमाई हॉस्पिलतर्फे धरणगाव तालुक्यातील अहिरे येथिल हिम्मत पाटील, बांभोरी बु॥चे पोपट पाटील, कवठलचे महेंद्र पाटील, तर जळगाव तालुक्यातील शिरसोलीचे भगवान मराठे व जळकेचे संजय पाटील या पात्र दिव्यांग बांधवाना सी.डी.100 या कंपनीच्या 5 मोटार सायकलचे वाटप करण्यात आले. मतदारसंघात प्रथमच मोटारसायकल वाटप झाल्यामुळे या दिव्यांग बांधवांच्या चेहर्यावर समाधान व्यक्त होत होते. यावेळी जेष्ठनागरिकांना आधार काठीचेही वाटप ना. गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शिवसेवा समितीला धनादेश वाटप
पाळधी येथे 101 सदयांची ’शिवसेवा’ समिती स्थापन करण्यात आली आहे.सदर समिती मार्फत विविध सामाजिक कार्य करण्यात येते.प्रदूषण रोखण्यासाठी ही विशेष काम केले जाते.या समितीला 11 हाजराचा धनादेश ना गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवसेवा समितीचया पदाधिकार्यांना देण्यात आला. तसेच पाळधी येथील हर्षदा चौधरी (88 टक्के), अश्विनी सोनार (86 टक्के), प्रियंका पाटील (85 टक्के), अभिषेक कुंभार (84 टक्के) यांच्यासह दहावीत प्रथम, व्दितीय तृतीय आल्याबद्दल सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.