आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांना मदत

0

पुणे । आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांचे शिक्षण व संगोपन करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, या भावनेतून शिवाजीनगर गावठाणातील नागरिकांनी या मुलांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमात आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या निराधार मुलांचे लोकवर्गणीतून शिक्षण व संगोपन केले जाते. या आश्रमाला श्री रोकडोबा देवस्थान ट्रस्टतर्फे 1 लाखाहून अधिक किमतीचे धान्य, कपडे, शालेय साहित्य, रोख रक्कम आणि धनादेश स्वरुपात मदत देण्यात आली.

यावेळी अ‍ॅड. श्रीकांत शिरोळे, नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, श्रीमंत कोकाटे, अ‍ॅड. बिपीन पाटोळे, उदय मोरे, संजयसिंह शिरोळे, अतुल बहिरट, अनिल कांबळे, बाबा शेख, राहुल शिरोळे, मच्छिंद्र कांबळे, इक्बाल शेख, शैलेंद्र बडदे उपस्थित होते.