आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटूंबास धनादेश वाटप

0

पाचोरा । पाचोरा तालुक्यात आत्महत्या ग्रस्त शेतकरींच्या व राष्ट्रीय कुटूंब योजनेतील लाभार्थ्यांच्या कुटूंबातील वारसांना आमदार किशोर पाटील यांच्याहस्ते तहसिलदार दालनात धनादेशांचे वाटप करण्यात आले. पाचोरा तालुक्यात मागील काळात कर्जबाजारीतून व नैसर्गिक आपतीतून निराश झालेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या होत्या त्यातील युवराज रोहिदास जाधव रा. कोकडी या मयत शेतकर्‍यांची पत्नी सविता युवराज जाधव, आनंदा शिवराम कोळी (रा. कुरंगी) यांची पत्नी सुशिला कोळी व बाळू भास्कर शेलार (रा. नेरी) यांच्या पत्नी सुशिलाबाई शेलार ह्या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटूंबात धनादेश देण्यात आले.

आमदार किशोर पाटील यांची उपस्थिती
दारीद्रय रेषेखालील असलेल्या कुटूंबातील कर्तापुरुषाच्या निधनामुळे निराधार झालेल्या 26 कुटूंबातील वारसांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचे अर्थसहाय्य निधी मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्याहस्ते कलाबाई सुरेश बावीस्कर (पाचोरा), लिलाबाई सुकदेव बागुल (पाचोरा), आशाबाई राजु बागुल पाचोरा, सुनंदा दौलत भिवसने (पाचोरा), बेबीबाई रविंद्र भिवसने (पाचोरा), वंदना रतन ब्राम्हणे(पाचोरा), नौशाद बी हारुण खाटीक (पाचोरा), रुबीनाबी मुनाफशा फकिरा (सातगाव), कल्पना सुनिल सुतार (लासगाव), लताबाई संजय हटकर (भातखंडे), लताबाई आबा अहिरे (सारोळा खु), संमीबाई प्रेमराज राठोड (पिंपळगांव), नितीन वाल्मीक सुर्यवंशी (नांद्रा, सुनंदा संजय पाटील अंतुलीर्र् खु, मंगला नाना सोनवणे (गाळण खु), सायराबी फिरोज पटेल (पाचोरा), नुरबी मदेखा तडवी (सातगाव), साबीराबी महंम्मद काकर (लोहारी खु), मंगल काशिनाथ महाजन (नगरदेवळा), सलमाबी जाकीर काकर (भोकरी), जहराबी मुस्ताक खान (पाचोरा), सुनिता मोतीराम ठाकरे (बांबरुड खु.)प्र.पा, सताबाई देवराम भोई (कुरंगी), आलमनुर चिंधु तडवी(शिंदाड), सुनंदा गोविंद महाले(पिंपळगाव), त्यांना धनादेश आमदार किशोर पाटील यांच्याहस्ते देण्यात आले या वेळी तहसिलदार बि.ए.कापसे, नायब तहसिलदार अमित भोईटे, जि.प. सदस्य पदमसिंग पाटील, अरुण गणेश पाटील, भरत खंडेलवाल, चंद्रकांत धनवडे, आनंद पगारे आदींची उपस्थिती होती.