आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0

जळगाव । येथील भरारी फाउंडेशनतर्फे शेतकरी संवेदना अभियानांतर्गत जिल्ह्यातील कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या 117 पाल्यांना शैक्षणिक साहित्य व वर्षभराच्या शैक्षणिक खर्चाच्या वाटपाचा कार्यक्रम 30 जून शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मंगलमय हॉल, पोलीस मुख्यालय जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष असून गेल्या चार वर्षांत आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या 275 पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून दत्तक घेतले आहे. यासाठी उद्योगपती रजनीकांत कोठारी, भवरलाल कांताबाई जैन मल्टीपर्पज फाऊंडेशन, रोटरी वेस्टचे डॉ. गोविंद मंत्री, नवजीवन सुपर शॉपी, रमेश मुणोत, नंदलाल गादीया, राजेश मलिक, निमेश कोठारी, स्मिता बाफना, रवींद्र लढ्ढा यांचे सहकार्य लाभत आहे. तरी पुढील अभियानाकरीता दानशूरांनी हातभार लावावा असे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी केले आहे.