आत्महत्याची धमकी देणार्‍याची यादी गेटवरच लावली

0

मुंबई । मंत्रालयाने आत्महत्या रोखण्यासाठी नविन शक्कल लढविली आहे. आत्महत्या तसेच आत्मदहन रोखण्यासाठी अजब कल्पना राबविली आहे. जे आत्महत्या करण्याची शंका आहे,निदर्शन,गोधळ घालणारे, अशा लोकांची यादी गेटवर असणार्‍या सुरक्षारक्षकाकडे देण्यात आली आहे.त्यामुळे असे लाके गेटवर आल्यावर त्यांना कारण विचारले जावून शंका आल्यास त्यांना पोलिसांच्या स्वाधिन केले जातो.गेल्यावर्षी मार्च महिन्यात माधव कदम नावाच्या एका शेतक-याने मंत्रालयाबाहेर आत्महत्या केली होती. यानंतर मंत्रालयातील पोलीस सतर्क झाले आणि आत्महत्या करु शकतात अशा लोकांची माहिती काढण्यास सुरुवात केली.

मंत्रालयातील पोलिसांनी मुख्य गेटवर अशा लोकांची यादी आणि फोटो लावले आहेत ज्यांनी भुतकाळात काही समस्या निर्माण केली होती किंवा आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. मंत्रालय सुरक्षेचे प्रमुख पोलीस उपायुक्त शांतिलाल भामरे यांनी, ’आत्महत्या किंवा आत्मदहन करण्याची धमकी देणा-यांची यादी आम्ही तयार करतो. निदर्शन करणारे, गोंधळ घालणारे, हे लोक सरकारी कामकाजात अडथळा आणतात. आम्ही ही यादी गेटवर असणा-या सुरक्षारक्षकाकडे देतो. यामधील कोणी जर मंत्रालयात येताना दिसलं तर त्यांना येण्याचं कारण विचारलं जातं. काही शंका असल्यास त्यांना स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन केलं जात,’ असं सांगितलं आहे.

’अनेकदा आत्महत्या करण्याच्या हेतूनं मंत्रालयात आलेले लोक आम्ही असं काही करणार नाही हे लिखित स्वरुपात देतात तेव्हाच त्यांना जाऊ दिल जातं,’ असंही भामरे यांनी सांगितलं आहे. या यादीतून 37 नावे होती त्यामधील तिघांनी लिखित स्वरुपात आश्वासन दिल्याने त्यांची नावे हटवण्यात आली आहेत. लोकांना याची माहिती मिळावी यासाठी मुख्य गेटवर संगीता शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे. मार्च 2016 रोजी माधव कदम या शेतकर्‍याने विषारा औषध घेवून आत्महत्या केल्याने जोरदार टीका केली ैहोती.अशा घटना होवू नये काळजी घेण्याचा आदेश देण्यात आला होते. मंत्रालयात कोणाताही अनुचित प्रकार घडू नये मंत्रालयात येणार्‍या आंदोलक, नागरिकांसोबतच लोकप्रतिनिधीवर पोलिसांची नजर असणार आहे.मंत्रालयातील कर्मचार्‍याला मारहाण करण्याचा आरोप असलेल्या आमदाराची पालिस ‘विशेष ’ खबरदारी घेणार आहेत. हे आमदार महोदय मंत्रालयात आल्यानंतर त्यांनी गोधळ करू नये यासाठी त्यांच्यासोबत चार पोलिस कर्मचारी देण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.