आत्महत्येपूर्वी व्हिडिओ व्हायरल करीत 21 वर्षीय तरुणाची आत्महत्या

जळगाव : फर्निचर काम करणार्‍या 21 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. ही घटना हरीविठ्ठल नगरात गुरुवारी दुपारी उघडकीस आली. रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. धीरज शिवाजी काळे (21, रा.हरीविठ्ठल नगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, धीरजने आत्महत्या करण्याच्या काही मिनिटे आधी सोशल मिडीयावर आत्महत्या करीत असल्याबाबत व्हिडिओदेखील व्हायरल केल्याचे समोर आले आहे.

कामावर असताना केली आत्महत्या
धीरज काळे हा आई-वडील आणि भाऊ यांच्यासह वास्तव्यास होता व भाऊ व वडीलांसोबत फर्निचरचे काम करून उदरनिर्वाह करीत होता. गुरूवार, 14 जुलै रोजी धीरज हा वडील शिवाजी श्रावण काळे यांच्या सोबत अनुराग स्टेट बँक कॉलनी फर्निचरच्या कामाला गेला होता. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वडीलांचे लक्ष नसतांना एका खोलित गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस येता रामानंद नगर पोलीस ठाण्याचे हवालदार सुनील पाटील व हरीश डोईफोळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तरुणाचा मोबाईल जप्त केला. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुणाच्या पश्चात वडिल शिवाजी श्रावण काळे, आई संगीता, भाऊ संदीप, मंगेश व विवाहित बहिण असा परीवार आहे.