मुक्ताईनगर । तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथील विवाहितेस जीवे मारण्याची धमकी देत तिला विषारी पदार्थ सेवन करण्यास भाग पाडून आत्महत्येस प्रवृत्त करणार्य पती व सासूविरुध्द मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पतीस अटक करण्यात आली आहे.
यशोदा उर्फ योगिता अनिल खोंदले (वय 25) हिस पती अनिल तुकाराम खोंदले व सासू यशोदाबाई तुकाराम खोेंदले (दोघे रा. चिंचखेडा बुद्रुक) यांनी गेल्या एक वर्षापासून ते आजपावेतो यशोदा खोंदले हिला घरदुरुस्तीसाठी माहेरुन पैसे आणण्याची मागणी करीत होते. यासाठी तिचा वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ करुन जीवे मारण्याची धमकी देत होते. या जाचाला कंटाळून यशोदा खोंदले हिस 16 रोजी दुपारी विषारी पदार्थ सेवन करुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. याप्रकरणी पार्वताबाई खराटे (रा. आळमपूर, ता. नांदुरा, जि. बुलढाणा) यांच्या फिर्यादीवरुन पोलिसात पती अनिल खोंदले व सासू यशोदाबाई खोंदले यांच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक वंदना सोनुने करीत आहे.