चाळीसगाव – चारीत्र्यावर संशय घेवुन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या भुसावळ येथील डॉक्टर पतीस चाळीसगाव शहर पोलीसांनी ६ महीन्यानंतर भुसावळ येथुन अटक केली असुन १९ डिसेंबर रोजी चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता त्यास २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तालुक्यातील टाकळी प्र.चा. येथील माहेर असलेल्या डॉ. स्मिता चेतन सुर्यवंशी यांचा विवाह भुसावळ येथील डॉ.चेतन सुरेश सुर्यवंशी यांच्याशी चाळीसगाव येथील पाटीदार मंगल कार्यालयात दिनांक १४ डिसेंबर २०१७ रोजी लग्न झाले होते लग्न झाल्यानंतर महीनाभरातच तिचा चारीत्र्याच्या संशयावरुन सासरकडील मंडळीकडुन छळ सुरु होता याला कंटाळुन विवाहीता डॉक्टर २६ जून २०१८ रोजी मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केली होती. आत्महत्या केल्याच्या ठिकाणी दोन चिठ्ठी मिळून आल्यानंतर पती डॉ. चेतन सुर्यवंशी यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.