जळगाव । पाचोरा तालुक्यातील डोंगरगावातील रहिवासी ज्ञानेश्वर आण्णा पाटील याच्याकडे उधारीचे पैसे घेणे असल्याने आनंदा शेषराव लोखंडे (वय-25) व गयाबाई शेष लोखंडे (वय-48 दोन्ही रा.डोंगरगाव) दोघांनी पैशांचा तगादा लावला होता. तर पैसे मिळत नसल्याने दोन्ही आई-मुलाने ज्ञानेश्वर याला शिवीगाळ व धमक्या देणे सुरू केले होते. अखेर ज्ञानेश्वरने दोघांच्या त्रासाला कंटाळून 6 जुन रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास विषप्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर मयत युवकाच्या वडीलांनी आण्णा नामदेव पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा तालुक्यातील पिंपगळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात आत्महत्तेस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या संशयित आनंदा शेषराव लोखंडे व गयाबाई शेष लोखंडे हे न्यायालयीन कोठडीत आहेत. तर आई-मुलाने जामीन मिळावा यासाठी न्यायाधीश ज्योती दरेकर यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज शुक्रवारी कामकाज होवून दोघांचे जामीन अर्ज न्या. दरेकर यांनी फेटाळून लावले आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड. केतन ढाके यांनी कामकाज पाहिले.