आत जाण्यासाठी रूग्णांना वळसा मारावा लागतो

0

ल्हासनगर । उल्हासनगरातील मध्यवर्ती रूग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या गेटला रुग्णालय प्रशासनाने टाळे लावल्याने गेटमधून येणार्‍या रूग्णांना तसेच गेटलगतच असणार्‍या मंदीरात येणार्‍या जाणार्‍या भाविकांना गेट बंद असल्यामुळे लांबचा पल्ला गाठून रूग्णालयाच्या प्रवेशद्वारातून यावे लागत असल्याने रुग्ण आणि स्थानिकांत संतापाचे वातावरण पसरले आहे.

उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. 3 परिसरात मध्यवर्ती शासकीय रूग्णालय असून या रूग्णालयात शहरी भागासह खेडयापाडयातून मोठया प्रमाणात नागरीक उपचारासाठी येत असतात. रूग्णालयाच्या प्रवेशद्वारासह मागे असलेल्या मोठया गेटमधूनही त्या रूग्णालयात नागरीक मोठया प्रमाणात येत असतात. याशिवाय मागील बाजुच्या गेटजवळ दत्त मंदीर असून या मंदीरातही देवदर्शनासाठी भाविक मोठयाप्रमाणात येत असतात. मात्र गेल्या 2 आठवडयापासून रूग्णालयाच्या मागील गेटला टाळं लावण्यात आले आहे. त्यामुळे त्या गेटमधून रूग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रूग्णांना लांबचा पल्ला गाठून रूग्णालयाच्या प्रवेशद्वारातूनच यावे लागत आहे.

पार्किंगचा त्रास
रूग्णांसाठी व मंदीरात येणार्‍या भक्तांसाठी मागचे गेट खुले करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक प्रधान पाटील यांनी केली आहे. तर दुसरीकडे मागच्या गेटमधून बाहेरील वाहने रूग्णालयात आणून त्याठिकाणी सर्रास पार्किंग केली जात असल्याने मागील गेट बंद करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.