जळगाव । आदर्श नगरातील 55 वर्षीय प्रौढ गेल्या महिन्याभरापासून काहीही न सांगता घरून निघून गेला असल्याने आज रामानंद नगर पोलिस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,केळकर मार्केटमधील व्यावसायिक नरेश कारवा यांचे मोठे भाऊ इंदर रामचंद्र कारवा वय 55 हे आदर्श नगरमधील प्लॉटमध्ये एकटेच राहत होते. त्याची आई रोज त्यांच्याकडे जात येत असायची. दि.8 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता त्यांना भेटून आली. त्यानंतर पुन्हा गेली असता, त्यांच्या घराला कुलुप दिसून आले. इंदर कारवा कोणाला काहीही न सांगता निघून गेल्याने महिन्याभरापासून कुटुंबियांकडून त्यांचा शोध सुरु होता. आज रामानंद नगर पोलिस स्टेशनला नरेश कारवा यांच्या खबरीवरून हरविल्याची नोंद करण्यात आली असून तपास पोहेकॉ. मनोज इंद्रेकर करीत आहे. तसेच सदर वृद्धाबाबत काही माहिती मिळाल्यास त्वरीत रामानंद नगर पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.