आदर्श गावासाठी सहकार्याची अपेक्षा

0

जळगाव। पं तप्रधान नरेंद्र मोदींच्या आदर्श गाव निर्मितीचे स्वप्न साकारण्यासाठी मतदार संघाचे खासदार ए.टी. पाटील यांनी पाचोरा तालुक्यातील लोहटार गावाची निवड केली. य गावास केंद्र व राज्य शासनातील विकास योजनेंची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जि.प. साईओ कौत्सुभ दिवगावकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली लोहटार येथे सहविचार सभेचे आयोजन पं.स. सभापती सुभाष पाटील, बी.डी.ओ. गणेश चौधरी यांनी केले.

सहभागाचे आवाहन
प्रास्ताविकात सभत्तपती सुभाष पाटील यांनी खासदार पाटील यांनी लोहटार गावाची निवड केल्याचे आभार मानले. जि.प.सीईओ दिवेगावकर म्हणाले की, कोणताही शासनाच्या विविध योजनांच्या निधी एकत्रिकरणातून होत असल्याने प्रशासनासोबत नागरिकांनी देखील जबाबदार्‍या घेतल्या पाहीजे. तर मार्गदर्शन भाषणात जिल्हाधिकारी निंबाळकरांनी सांगितले की, आदर्श गाव घडवितांना संतांची प्रेरणा झाली. गावाच्या विकासात पं.स. व ग्रा.पं.चे फार मोठे योगदान असते. शासनाच्या विविध विकास योजना गावातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवून त्यांना शिक्षण, पाणी, विज, घरकुले, स्वच्छता, पशु संवर्धन, आरोग्य या मुलभुत सुविधा मिळाल्या पाहिजे.

गरजूंसाठी विविध योजना राबविण्याचे प्रशासनाला निर्देश : आदर्श गाव निर्माणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मिळणार्‍या विकास निधीतून गावाचा सर्वांगीण विकास पक्षभेद व जातीभेद न करता साधावा. नागरीकांचे राहणीमान, उत्पन्नवाढीसह बेरोजगारी निर्मुलनासाठी तसेच शेतकर्‍यांच्या सक्षम करण्यासाठी केंद्र शासन जनहितांचे निर्णय व योजना राबवित आहे. बँकांकडून कर्जपुरवठा, आरोग्य शिबीरे, माती बंधारे, जल संधारणाची कामे, वीजेच्या जिर्णतारा व जिर्ण खांब बदलवा, पशुहानी होवू देवू नका. तसेच वन विभागाने तालुक्यात वृक्षतोड व लाकडांची अवैध वाहतुकीवर नियंत्रण आणून ‘झाडे लावा व झाडे वाचवा’ याकडे लक्ष देण्याचे आवाहन करून संकल्पनेतून देश समृद्धीकडे नेण्यासाठी लोहसहभागातून कार्य करण्याचे आवाहन केले. खासदार ए.टी.पाटील यांनी पंतप्रधान मोदींच्या ‘आदर्श गाव स्वप्न साकार सांसद आदर्श गाव’ योजनेतून निवड केलेल्या लोहटार गावाची उपस्थितांनी पाहणी केली.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती

यावेळी जि.प.शिक्षण सभापती पोपट भोळे, स.क. सभापती प्रभाकर सोनवणे, एस.पी.दत्तात्रय कराळे, एसीईओ दिनेश वाघ, अ.जिल्हा प्रबंधक दामले, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी मतकर, जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील, डी.एम. पाटील, डॉ.संजीव पाटील, जि.प.सदस्य मधुकर काटे, विजया पाटील, डीवायएसपी केशव पातोंड, पं.स.सदस्य बन्सीलाल पाटील, ज्ञानेश्‍वर सोनार, वसंत गायकवाड, कल्पना पाटील, अनिल पवार, तालुका सरचिटणीस प्रदीप पाटील, कृउबाचे संचालक दत्ता पाटील, सतीश शिंदे, भडगाव तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, कमलेश पाटील, शरद पाटील, हिम्मत निकुंभ, नरेंद्र पाटील, युवानेता अमोल शिंदे, गोविंद शेलार, तहसिलदार बी.ए.कापसे आदी उपस्थित होते.