सरपंचपदी वैशाली टाकोळे: आमदार संजय सावकारेंची चालली जादू
भुसावळ: तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या फुलगावात माजी मंत्री संजय सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मतदारांनी पुन्हा भाजपाला एकहाती सत्ता दिली असून लोकनियुक्त सरपंचपदी वैशाली टाकोळी यांनी विजय मिळवला. भाजपाच्या येथे सात जागा आल्या असून प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीला चार जागांवर समाधान मानावे लागले. माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री व आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली व जि.प.चे माजी सदस्य राजेंद्र साहेबराव पाटील यांच्या ग्रामविकास पॅनलची येथे सरशी झाली. निकालानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.