आदर्श शिक्षक पुरस्काराचे गुरुवारी वितरण

0

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गुणवंत शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स विकास मंत्री महादेव

जानकर यांच्या हस्ते गुरुवार दि. 12 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे होणार आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून पुणे जिल्हाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र राज्याचे कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे उपस्थित राहणार आहेत. तसेच खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांची विशेष उपस्थिती असणार असून प्रमुख उपस्थिती खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांची असणार आहे. महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार व बाल रंगभूमी परिषदेचे अध्यक्ष प्रकाश पारखी, शिक्षण समिती सभापती मनिषा पवार, शिक्षण समिती सदस्य चंदा लोखंडे, सागर गवळी, निर्मला गायकवाड, शशिकांत कदम, वैशाली काळभोर, सुलक्षणा धर, रेखा दर्शले, भाऊसाहेब भोईर यांच्यासह सर्व नगरसदस्य व नगरसदस्या उपस्थित राहणार आहेत. यावेळी एकूण 31 शिक्षकांना व 4 शाळांना पुरस्कार देवून गौरवण्यात येणार आहे. तसेच गुणवत्ता वाढीसाठी काम करणारे विषयतज्ञ, 10 तंत्रस्नेहींचा व चालू वर्षी 100 नी पट संख्या वाढणा-या शाळांचा सत्कार करण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती व नवोदय परिक्षांमध्ये गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या 11 विद्यार्थी व शिक्षकांचा ही सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.