आदर्श साखरपुड्यात विवाह; वधुवरांनी दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

0

चाळीसगाव। शहरात मंगळवार 13 जून 2017 रोजी गावाचे पोलीस पाटील श्री.राजेंद्र माळी यांची मुलगी व भोरस येथील देविदास साळुंखे यांचे चिरजिव धनंजय यांचा जि.प.शाळा ब्राम्हणशेवगे येथे जुन्या चालिरीती, परंपरा, अवाजवी होणारा खर्च बाजूला सारून साखरपुड्यातच विवाह संपन्न झाला.

तसेच लोकसंघर्ष मोर्चाचे प्रसिध्दी प्रमुख यांचे संकल्पनेतुन विवाह प्रसंगी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला तसेच वधु-वरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व झाडांची रोपे वाटप करण्यात आली. याप्रसंगी पारधी समाजाचे एम.झेड.चव्हाण, गोरख पारधी, सखाराम पवार,जालिंदर पवार, बाबासाहेब पवार, अंकुश पवार, सिमा चव्हाण, पं.स.समिती सदस्य अजय पाटील(हिरापुर), सुनिल पाटील (भोरस), पं.स.सदस्य विश्वभर पवार, मार्केट कमिटी संचालक हेमंत पाटील, सरपंच आशा माळी,माजी उपसरपंच शांताराम नेरकर, ज्ञानेश्वर राठोड, दत्तात्रय पवार, मदन राठोड, रत्नाकर बाविस्कर, अ‍ॅड.शिवाजी बाविस्कर, जालींदर बाविस्कर, अनिल नेरकर, बाळासाहेब बाविस्कर व ग्रामस्थ उपस्थित होते.