आदर्श सेवा पुरस्कार विजेत्या विसपुतेंचा सत्कार

0

शहादा । येथील व्हालंट्ऱी महिला मंडळ संचलित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका निर्मला विवेक विसपुते यांना आदर्श सेवा पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी शाळेचा मुख्याध्यापिका ताराबाई बेलदार होत्या. तर पमुख अतिथी म्हणुन संस्थेचे सचिव डॉ. राजेश कुलकर्णी, प्रविणाताई कुलकर्णी डॉ. स्मिता जैन, इंदुमती पाटील, प्राचार्य नम्रता पाटील यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून नावलौकींक
आदर्श सेवा पुरस्कार प्राप्त शिक्षिका निर्मला पाटिल यांना संस्थेचे पदाधिकारी इंदुमती पाटील व डॉ. स्मिता पाटील यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. निरोगी शरीर व विद्यार्थ्याना बलोपासनेची साधना देत विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्या प्रचलित आहेत. निर्मला विसपुते ह्या आदर्श शिक्षक विवेक विसपुते यांचा पत्नी आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्काराने त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.