आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे फलक फाडले : धरणगावातील प्रकार

Shocking! : In Dharangaon city, Yuva Sena chief Aditya Thackeray’s welcome board was torn down! धरणगाव : जळगाव जिल्हा दौर्‍यावर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आले असतानाच त्यांच्या स्वागताचे फलक फाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार धरणगाव शहरात घडल्याने खळबळ उडाली.

पुतळा परीसरातील फलक फाडला
युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे शनिवारी जिल्हा दौर्‍यावर आले असताना धरणगाव येथे देखील स्वागतांचे फलक लावण्यात आले होते. त्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परीरसरात लावलेला एक फलक रात्री उशीरा शुक्रवारी रात्री अज्ञाताने फाडले.

पोलिस तपासातून तथ्य येणार समोर
याबाबतची माहिती कळताच रात्रीच शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ व माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी आपल्या सहकार्‍यांसह पोलीस स्थानक गाठले. याबाबत रात्री उशीरा अज्ञात समाजकंटकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात निलेश चौधरी म्हणाले की, धरणगावात आजवर टोकाचा राजकीय विरोध असून देखील कुणा नेत्याचे बॅनर फाडण्यात आलेले नाहीत. मात्र आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे फलक फाडण्याचा घृणास्पद प्रकार घडला असून या प्रकरणी पोलीस तपासातून तथ्य समोर निश्चित येईल.