रावेर। दुबई येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत येथील आदित्य पाटील याने रजत पदक पटकावले. दुबई येथे गुडोकॉन कप कराटे स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.
नाशिक येथील फ्रवशी इंटरनॅशनल स्कुलचा विद्यार्थी आदित्य पाटील याने प्रत्येकी रजत आणि कांस्य पदक पटकावले आहे. आदित्य हा इयत्ता आठवीचा विद्यार्थी असून महाराष्ट्रातून त्याने परदेशात पदक मिळवून रावेर शहराचे नाव उंचावले आहे. आदित्य हा डॉ. संदिप पाटील व डॉ. योगिता पाटील यांचा मुलगा असून त्याच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.