आदित्य, सुभाषचे निर्णायक गोल

0

मुंबई। स्लॅशेट फुटबॉल क्लब आणि कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनच्या ब संघानी निसटते विजय मिळवत मुंबई शहर फुटबॉल संघटना आयोजित थर्ड डिव्हीजन सामन्यांमधील आगेकूच कायम राखली. तुल्यबळ लढतीत स्लॅशेट फुटबॉल क्लबने 10 खेळाडूंसह खेळणार्‍या कोळी बॉईज संघाचा 1-0 असा पराभव केला.

या सामन्यात आदित्य देशपांडेने 35 व्या मिनीटाला केलेला गोल निर्णायक ठरला. सामन्यातील पंच जगजीत रिन यांना खेळाडूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुक्तहस्ते रेडकार्डचा वापर करावा लागला. सामन्यातील 28 व्या मिनीटाला रिनी यांनी धुसमुळ्या खेळासाठी कोळी बॉईज संघाच्या संतोष धोंगडेला लाल कार्ड दाखवले. त्यानंतर अवघ्या आठ मिनीटांनी त्यांनी कोळी बॉईज संघाच्या कौस्तुभ वैतीला कार्ड दाखवले. या स्लॅशेट संघाच्या जय भानुशाली, प्रणव चन्हा, मीत राठोड आणि सौरभ साळवीला पंचानी कार्ड दाखवले.

अन्य लढतीत कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनच्या ब संघाने सेंट रॉक फुटबॉल क्लबचा 1-0 असा पराभव केला. सौरभ शुक्लाने सामन्यातील 45 व्या मिनीटाला गोल करून संघाला विजयाचे पूर्ण तीन गुण मिळवून दिले.