श्रींची जल्लोषात स्थापना : जय गणेश फाऊंडेशनतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
भुसावळ- शहरातील सुरभी नगरातील जय गणेश फाऊंडेशनतर्फे सालाबादाप्रमाणे श्रींची जल्लोषात स्थापना करण्यात आली. यंदा फाऊंडेशनतर्फे तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील आदियोगी शिवाची प्रतिकृती साकारण्यात आली असून ती पाहण्यासाठी शहरातील गणेश भक्तांची मोठ्या संख्येने दररोज गर्दी होत आहे.
श्रींची जल्लोषात स्थापना
पहिल्या दिवशी गुरुवारी विधीवत श्रींची स्थापना करण्यात आली. प्रसंगी ओंकार भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला तर शिक्षक गणेश फेगडे व सौ.नीलिमा फेगडे यांनी कलशाची मिरवणूक काढली. प्रसंगी संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, अरुण मांडळकर, चैत्राम पवार, शांताराम बोबडे, देवेंद्र राजपूत, उत्सव समितीचे अध्यक्ष तुषार झांबरे, राहुल भावसेकर, नीलेश कोलते, नीलेश शर्मा, अमरीश करसाळे, प्रवीण पाटील यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
शनिवार, 15 रोजी सायंकाळी पाच वाजता ‘मातृ देवा भवः, पितृ देवो भवः’ व ‘भारत माझी माता’ या विषयावर दोन गटात स्पर्धा घेण्यात आली तर रात्री ईस्कॉनतर्फे कीर्तन झाले. रविवार, 16 रोजी सकाळी दहा वाजता ‘स्वच्छ भारत अभियानात माझी जवाबदारी’ व ‘प्रदूषणाचा राक्षस संहारक’ या विषयावर स्पर्धा घेण्यात आली तर रात्री आठ वाजता सोलो डान्स स्पर्धा होणार आहे. सोमवार, 17 रोजी रात्री आठ वाजता सोलो डान्स स्पर्धा होणार आहे. मंगळवार, 18 रोजी रात्री आठ वाजता ‘भुसावळ शहराची सांस्कृतिक वाटचाल’ या विषयावर परीसंवाद होईल. बुधवार, 19 रोजी रात्री आठ वाजता ‘सोशल मिडीया शाप की वरदान’ या विषयावर ‘दैनिक जनशक्ती’चे संपादक शेखर पाटील व अनघा कुलकर्णी यांचे व्याख्यान होईल. गुरुवार, 20 रोजी सकाळी दहा वाजता रंगभरण स्पर्धा, दुपारी चार वाजता रांगोळी स्पर्धा, रात्री आठ वाजता गु्रप डान्स स्पर्धा होईल. शुक्रवार, 21 रोजी रात्री आठ वाजता ग्रुप डान्स स्पर्धा तर शनिवार, 22 रोजी रात्री आठ वाजता ‘अंधश्रद्धा अन जादूचे प्रयोग’ एस.के.जादूगर सादर करतील तसेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही होईल. रविवार, 23 रोजी सकाळी 10 वाजता मराठमोळ्या संस्कृतीचे शाही प्रदर्शन घडवणार्या श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.