आदिवासींचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा होता !

0

धुळे । देशाचा मूळमालक दुसरा तिसरा कोणी नसून आदिवासी माणूस होता. आदिवासींना माणूस म्हणून जगण्याचा हक्क वापरला, पण इतिहासाचा एक सिध्दांत आहे. जेव्हा जेव्हा अन्यायाची परिसीमा गाठली जाते. तेव्हा माणूस बंड करून उठतो. आदिवासींचा इतिहास भव्य दिव्य होता, स्फूर्तिदायक होता आणि आजही तो सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा आहे, असे गौरवोद्गार कुडाशी येथे औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठ येथील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. पद्माकर सहारे यांनी काढले. ते मा.खा. कै. रेशमाभाऊ मोतीराम भोये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या साक्री तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या अध्यक्ष -स्थानावरून बोलत होते.

माध्यमिक गटात वैभवी चौरे प्रथम
तीन गटात स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले. इयत्ता 7 वी ते 10 वी माध्यमिक गटात 47 स्पर्धेकांमधून अनुक्रमे प्रथम-पारितोषिक वैभवी चौरे,द्वितीय – भावेश चौरे, तृतीय -सुप्रिया चौरे व उत्तेजनार्थ -जयश्री पवार यांना जाहीर झाले. दुसर्‍या गटातील स्पर्धेसाठी 23 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यात प्रथम पारितोषिक देविदास कोकणी,द्वितीय -खुशाली अहिरे, तृतीय दिपाली बागुल यांनी पटकावले,उत्तेजनार्थ रोहित अरविंद बागुल यांना देण्यात आले.

यांनी पाहिले कामकाज
कर्मचारी गटात 24 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. प्रथम बकाराम सूर्यवंशी , द्वितीय पोपट गायकवाड, तृतीय विलास बागुल यांना जाहीर झाले. उत्तेजनार्थ अनिल चौरे व सुकेंद्र वळवी यांना जाहीर झाले. परिक्षक म्हणून महारू चौरे, जे. बी. निकम, राजाराम चौरे ,प्रा. पी. डी. कोतकर, एल. बी. मराठे आदींना काम पाहिले. यशस्वीतेसाठी शंकर चौरे,इश्‍वर ठाकरे, प्रा. एस. डी. पाटील, दिलीप बागुल , दयाराम कामडे, धाकलू अहिरे, संभाजी अहिरे, शांताराम पवार,अभिमन चौरे, अरूण चौरे, अरविंद बागुल कामकाज पाहिले.

मान्यवरांची उपस्थिती
यावेळी विचार मंचावर उद्घाटक म्हणून शासकीय कला,वाणिज्य महाविद्यालय आहवा डांग येथील प्राचार्य डॉ. काशीराम भोये, आदिवासी कोकणा -कोकणी समाज संघटनेचे राम चौरे, कवी रमेश भोये, जि.प.सदस्य पोपटराव गवळी, राजाराम चौरे,स्पर्धेच्या संयोजिका माजी सरपंच रिना भोये, माजी जि.प.कृषी सभापती शिवाजी भोये,टेंभे येथील सरपंच शशिकांत राऊत, शाळेचे मुख्याध्यापक विकास हेमाडे, नरेश भोगे, आश्रम वाकी आदी उपस्थित होते.