शहादा । रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील पुराणिकवाडा आदिवासी वाडी सेक्टर 11 मधील रहिवाशी आदिवासींचे घरे 6 जुन रोजी सिडकोच्या अधिकार्यांनी पाडलेत आदिवासींना बेघर करण्यात आले या घटनेचा तिव्र शब्दात भिल्लीस्थान टायगर सेना शहादा तालुकाच्या वतीने करण्यात येवून तहसील कार्यालयावर निदर्शने केलीत. निषेधाचे लेखी निवेदन तहसीलदार मनोज खैरनार याना देण्यात आले. तहसिलदार खैरनार यांनी निवेदन कर्त्याना आपल्या भावना लक्षात घेत सदरचे निवेदन वरिष्ठ अधिकारीना व शासनास अवगत करण्यात येईल असे आशवासन दिले. निवेदनावर रवींद्र ठाकरे , नान्हु ठाकरे, परशुराम सोनवणे, बलराम ठाकरे, सचिन पावरा, अमित पवार आदि पदाधिकारी सह संजय माळी, सिताराम ठाकरे, ईश्वर माळी, कैलास सोनवणे, लहु ठाकरे, रमेश मोरे, संतोष पाडवी, भारत सोनवणे, प्रवीण सोनवणे, दिलवर मालचे, सागर ठाकरे आदींच्या सह्या आहेत.