चायबासा: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज झारखंडमधील चायबासा येथे प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदींनी आदिवासींच्या हक्काची जमिन अनिल आबांनी यांना दिली आहे असे घणाघाती आरोप केले. राहुल गांधींनी उपस्थित मतदारांना संबोधित करताना, आदिवासी बांधवांच्या हक्काची जल-जंगल-जमीन मोदींनी अनिल अंबानीच्या घशात घातली असे आरोप केले. आदिवासी बांधवानो तुमच्या जमिनी बघा, सगळ्या जमिनी मोदींनी अंबानींना देऊन टाकले आहे असे राहुल गांधी यांनी सांगितले.
छत्तीसगडमध्ये भाजपने आदिवासींच्या जमिनी टाटा कंपनीच्या प्रकल्पासाठी घेतली होती. मात्र या जमिनीवर कोणतेही प्रकल्प सुरु करण्यात आलेले नाही. आमचे सरकार आल्यावर आम्ही या जमिनी आदिवासी बांधवाना परत केल्या असेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.