आमदार विजयकुमार गावीत ; विरोधकांकडून अपप्रचार
नंदुरबार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या बाबतीत जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल विरोधक गैरसमज पसरवीत असून आदिवासींच्या हिश्यात असलेल्या सवलती धनगर समाजाला दिल्या जाणार नाहीत, असा खुलासा भाजपचे आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी पत्रकार परीषदेत बोलतांना केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतला आहे त्याबाबत गैरसमज पसरविला जात असून आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागला तर आपण वेळ आली तर पक्षदेखील सोडू, असा इशारादेखील त्यांनी दिला. धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती दिल्या जाणार नसून पूर्वी ज्या सवलती धनगर समाजाला होत्या त्यात वाढ केली जाणार आहे, असेही आ.डॉ.गावीत म्हणाले.