जळगाव । आदिवासी चळवळी या अस्तित्वाच्या व विकासाचा लढा देणार्या असून त्यांना नक्षलवादी म्हणून घोषित करणे अनूचित आहे यातून आदिवासींची होणारी मुस्कटदाबी थांबवली पाहिजे असा सूर मू. जे. महाविद्यालयातील मराठी समाजशास्त्र परिषदेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय परिषदेत व्यक्त करण्यात आला. परिषदेच्या दोन दिवसीय 27 व्या अधिवेशनाचा 4 फेब्रुवारी रोजी प्रा.डॉ.संपत काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. यावेळी परिषदेचे समन्वयक प्रा. डॉ. जयश्री महाजन,मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार जाधव, सचिव डॉ.अरुण पौडमल, प्रा. सागर बडगे उपस्थित होते.
आदिवासींच्या समस्यांवर ठोस कृती करावी
मराठी समाजशास्त्र परिषदेतर्फे ज्येष्ठ अभ्यासक प्राचार्य डॉ. शेख शब्बीर, प्राचार्य डॉ.भा.वी.खडसे, प्राचार्य स्मृती भोसले, विजय चंद्रकांत गायकवाड, प्रा.डॉ.बाबुराव संभाजी जाधव, प्रा. संजय कांबळे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, दलित स्त्रियांच्या मुक्तीचा प्रश्न या ग्रंथास पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदिवासी चळवळींचा इतिहास आणि वर्तमान वास्तव- समाजशास्त्रीय दृष्टीक्षेप या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला.डॉ.सी.पी.लभाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात प्रा.के.के.वळवी, डॉ.देवेंद्र इंगळे, सुरेश ढमाले, डॉ. नारायण भोसले यांनी मार्गदर्शन केले.