शिंदखेडा। आदिवासी कोळी समाज समन्वय समितीच्या वतीने मुंबई आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यात आदिवासी वाल्मीकलव्य सेनेचे प्रमुख शानाभाऊ सोनवणे यानी मार्गदर्शन केले. यात त्यांनी आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी ठाकुर ठाकर तळवी भिल ढोर कोळी मन्यवार यांच्या वर होत असलेला अन्याय व त्यांच्या मुळे या आदिवासी समाजाची होत असलेली नुकसान न भरून निघणारी नाही म्हणून सर्व समाज एक जुटिने अखंड महाराष्ट्राततुन मुंबई येथे पद यात्रा काढून या सरकार ला सळो की पळो करून टाकु असे आव्हान केले.
यावेळी दशरथ भाडे, आमदार चंद्रकात सोनवणे, शरदचंद्र जाधव, नागनाथ घिसेवाळ, अविनास कोळी, मोहन सकपाळ, बबलु कोळी, सावन कोळी, कैलास बोरसे, राजु रगडे, सुमित देशमुख उपस्थितीत होते